Monday 27 April 2020

भारतातलं प्रदूषण 20 वर्षांतील नीचांकी पातळीवर.

🔲 करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

🔲 करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत.तर अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच सुरू आहेत.

🔲 मोठे-मोठे कारखाने, उद्योगधंदे बंद आहेत.तसेच बहुतांश लोक वर्क फ्रॉम होमचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे कार आणि इतर वाहनांमुळे होणारे प्रदुषणदेखील खूप कमी झाले आहे.

🔲 अशातच भारतासाठी एक अत्यंत चांगली बातमी आली आहे. भारतातील प्रदूषण हे 20 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर असल्याचे अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने अहवालात म्हटले आहे.

🔲 अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या उपग्रहाची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात, उत्तर भारतातील वायू प्रदूषण हे विविध वर्षांतील या कालावधीत प्रदुषणापेक्षा यंदाचे प्रदुषण हे 20 वर्षातील नीचांकी पातळीवर असल्याचे नमूद केले आहे.

🔲 करोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या उपग्रहाने सेन्सर्सच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात भारतात 20 वर्षातील सर्वात कमी एरोसोलची पातळी लॉकडाउननंतर आढळली.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...