Monday 27 April 2020

अमेरिकन कला-विज्ञान अकादमीवर भारतीय वंशाच्या रेणू खटोर

- अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्य़ूस्टन सिस्टीमच्या कुलगुरू रेणू खटोर यांची अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. खटोर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे मानले जाते.

- खटोर (५१) या आता अकादमीच्या अडीचशे प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक असणार आहेत. या अकादमीत साहित्यिक, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था, खासगी क्षेत्र, शिक्षण या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. खटोर यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. त्या भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी पहिल्या महिला कुलगुरू असून अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख आहेत.

- खटोर या २००८ पासून कुलगुरू आहेत व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केल्याने अकादमीवर निवडण्यात आले आहे.

- खटोर यांनी कानपूर विद्यापीठातून पदवी घेतली असून राज्यशास्त्र व लोकप्रशासनात त्यांनी परडय़ू विद्यापीठातून पीएचडी केली आहे. ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या चार संस्थांचा कारभार त्या पाहत असून एकूण ७१ हजार विद्यार्थी तेथे शिकतात.

- अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यांमध्ये २५० नोबेल व पुलित्झर मानक ऱ्यांचा समावेश आहे.

- या अकादमीची स्थापना १७८० मध्ये झाली असून जॉन अ‍ॅडम्स, जॉन हॅनकॉक यांच्यासह साठ विद्वानांच्या पुढाकारातून ती आकारास आली.

- ‘हा तर विद्यापीठाचा सन्मान!’
अमेरिकी कला व विज्ञान अकादमीकडून मिळालेल्या या सन्मानाने आपण समाधानी असून ह्य़ूस्टन विद्यापीठाचा हा सन्मान आहे. मला यात नेतृत्व कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे, असे मत खटोर यांनी व्यक्त केले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...