30 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?
उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?
उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

▪️ कोणत्या बँकेनी गुगल असिस्टंट आणि एलेक्सा या तंत्रज्ञानांवर व्हॉईस बँकिंग सेवा सुरू केली?
उत्तर : ICICI बँक

▪️ कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?
उत्तर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

▪️ 2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी

▪️ कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?
उत्तर : व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल

▪️ कोणत्या देशात ‘बाऊन्स बॅक लोन’ योजना सादर करण्यात आली आहे?
उत्तर : ब्रिटन

▪️ कोणत्या संस्थेनी ‘मल्टी-सर्फेस सेनिटायझर’ तयार केले?
उत्तर : IIT भुवनेश्वर

▪️ कोणत्या संस्थेनी ‘GRID 2020’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : IDMC

▪️ कोणत्या देशाने कोविड-19 विषयक BRICS परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद आयोजित केली?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेनी ‘फ्रॉम द ग्रेट लॉकडाउन टू द ग्रेट मेल्टडाउन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : UNCTAD

▪️ कोणत्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली?
उत्तर : दिपंकर दत्ता

▪️ आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल दुर्घटना स्मृती दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जीवन शक्ती’ योजना लागू केली?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️ कोणत्या कंपनीसोबत व्होडाफोन-आयडिया या कंपनीने ‘रीचार्ज साथी’ कार्यक्रम आरंभ करण्यासाठी करार केला?
उत्तर : पेटीएम

▪️ दसतिनिब या भारतीय ब्रॅंडची 'दसशील' ही जेनेरिक औषधी कोणत्या कंपनीने तयार केली?
उत्तर : शिल्पा मेडिकेअर

▪️ 2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर

▪️ अमेरिकेच्या NASA संस्थेनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरचे नाव काय आहे?
उत्तर : VITAL

▪️ कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले?
उत्तर : रसायने आणि पेट्रोकेमिकल्स

▪️ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी कृषी क्षेत्रासाठी खेळते भांडवल मागणी ऋणची घोषणा केली?
उत्तर : इंडियन ओव्हरसीज बँक

▪️ चर्चेत असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट’ (WTI) काय आहे?
उत्तर : कच्च्या तेलाचा एक ग्रेड

▪️ झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी कोणते अ‍ॅप तयार केले?
उत्तर : झारखंड बाजार

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...