Monday 18 May 2020

यशाचा राजमार्ग महत्त्वाची पोस्ट

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या lockdown
काळात विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत त्यातील काही प्रातिनिधिक प्रश्न आणि त्यांची उत्तरे मी द्यायचा एक प्रयत्न करत आहे.

1.Mpscची परीक्षा कधी होणार? विभागवार परीक्षा कधी होणार?

उ-थोड्या उशिरा होतील परंतु परीक्षा नक्की होणार. ज्यादिवशी परीक्षा होणार त्या दिवसाच्या परीक्षेसाठी तयार राहा. परीक्षा होण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो वेळ आपल्याला covid-19 विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी किती काळ लागणार आहे त्यावर अवलंबून आहे. संस्था ,शासन असो निर्णय हे असे असतात जे वेळ आणि परिस्थिती नुसार बदलत असतात त्यामुळे येत्या 4-5 महिन्यात जर परिस्थिती सुधारली तसेच कोणत्या विभागाला मनुष्यबळाची कमतरता जाणवली तर नक्कीच परीक्षा होतील.

2.घरी आहे, गावाकडे आहे अभ्यास होत नाही, मन लागत नाही काय करू?

उ-मित्रांनो अभ्यासाला लागते ती आंतरिक इच्छा! आपण त्याच घरी राहतो त्याच गावात राहतो जिथे आपण दहावी-बारावीची परीक्षा दिली चांगले मार्क्स मिळवून यशस्वी झालो आणि आता त्याच वातावरणात आपला अभ्यास होत नाहीये? का परीक्षा पुढे गेलेली आहे त्यामुळे अभ्यास करण्याची इच्छा होत नाहीये का? दुसऱ्यांशी आपण compare करतोय का? कोणीच अभ्यास करत नाहीये म्हणून मी पण अभ्यास करायचा नाहीये असे वाटते का? आपल्याला आपले ध्येय मिळवायचं असेल तर आंतरिक इच्छा हवी *(अभ्यास करायचा प्रयत्न होत नसेल तर आपली आंतरिक इच्छा आणि ध्येय मिळवण्यासाठीची समर्पित वृत्ती ची कमतरता आपल्यात आहे, अन् यशाच्या तीव्रते पेक्षा वडिलांच्या माराची भीती ची तीव्रता जास्त होती का? म्हणून ज्या घरात आत्ता आपला अभ्यास होत नाही त्याच घरात 10-12 ला अभ्यास करून चांगले मार्क मिळवले होते)* आणि अभ्यास करायलाच हवा हाच काळ आहे जो आपल्याला इतर विद्यार्थ्यां पेक्षा पुढे घेऊन जाईल पळत जा चालत जा रांगत जा किंवा घरंगळत जा परंतु आपला अभ्यासाचा प्रवास थांबवू नका.

3.अभ्यास संदर्भ उपलब्ध नाहीये अभ्यास कसा करू?

उ-मला मान्य आहे ऑफलाइन अभ्यास पुस्तके वाचन, पुस्तकात नोट्स काढणे पुस्तकावर रेघा मारून अभ्यास करणे हाच खरा अभ्यास परंतु या काळात काही काळापुरता का होईना अभ्यासाची modality बदलावी लागेल
A. YouTube वर आपणास ज्या शिक्षकाचे video समजत आहे त्यांचे शिकवणे समजत आहे असे video पहावे(ksagar spardha महाराष्ट्रातील समाज सुधारक या लेक्चर सिरीज साठी फॉलो करा)
B. ठराविक असे telegram channel फॉलो करा यावरून daily updates काही प्रमाणात current affairs यांचा अभ्यास होईल यासाठी आपण ksagar publication telegram channel फॉलो करू शकता.
C 3-4 आपल्या मित्रांचा एक discussion group बनवून व्हाट्सअप वर video call द्वारे ही आपण वेळ ठरवून,topic ठरवून discussion करू शकता.
D आपल्या घरातील लहान बहिण भाऊ यांचे शालेय पुस्तके किंवा कॉलेजमधील अशी पुस्तके की ज्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होऊ शकतो अशा पुस्तकांचे हे आपण वाचन करू शकता तसेच आपल्या शेजारील घरात जरी या पद्धतीचे पुस्तक उपलब्ध उपलब्ध होत असतील तेही वाचू शकता कोणताही स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा अभ्यास आपण करू शकता तो करावा. Specific subjectसाठी हट्ट धरू नये specific subject चा हट्ट म्हणजे आपली अभ्यास करायची इच्छा कमी असणे असा लावता येऊ शकतो (सर्वात महत्त्वाचे आपण जर इंटरनेटचा वापर (you tube, Facebook)जर अभ्यासासाठी करत असाल तर याचा वापर टाईम वेस्ट म्हणजे timepass साठी करू नका नाहीतर अभ्यास करता करता कधी टाईमपास करायला लागलो आणि कसा वेळ गेला हे समजणार नाही.)

4.इतक्या वर्ष अभ्यास करत आहे आणि परीक्षा पुढे गेली यामुळे tension येत आहे depression येत आहे काय करू?

उ-मित्रांनो आजची परिस्थिती उद्या रहात नाही आजचा प्रश्न उद्या राहत नाही सिच्युएशन चेंज होत राहते त्यामुळे अकारण tension घेऊ नका tension आणि depression येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे घरच्यांशी हरवलेला सुसंवाद यामुळे सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे घरच्यांशी सुसंवाद.. फक्त अशाच मित्रांशी कॉन्टॅक्ट ठेवा ज्यांच्यामुळे आपणास अभ्यास करण्याची स्फुर्ती मिळते प्रेरणा मिळते जे आपणास अभ्यास कर असे सांगतात. ज्या विद्यार्थ्यांमुळे negative vibes येतात,जाऊदे मरू दे रे माझा अभ्यास होत नाही tension येतंय,व अशा पद्धतीचे बोलणाऱ्या मित्र मैत्रिणी पासून काही काळापुरता संवाद कमी करावा. या काळात जमत असेल तर एक नवीन टाईम टेबल बनवा ज्यामध्ये घरच्या घरी yoga, मेडिटेशन काही व्यायाम करायचा प्रयत्न करा एक ठराविक वेळ घरच्यांशी संवाद साधण्यासाठी ठेवा. एक ठराविक वेळ स्वतःसाठी ठेवा, ज्यात आपण जमत असेल तर अवांतर वाचन, आवडत असलेले काम, गाणे ऐकणे किंवा ज्या गोष्टींमुळे आपले tension कमी होते अशा गोष्टींसाठी ठेवावा. घरात असल्यामुळे बाहेर मेसला जाऊन जेवण,बाहेर जाऊन चहा, मित्रांबरोबर च्या इतर गप्पा यासाठी जो वेळ राखून होता त्या

ऐवजी वरील गोष्टींना वेळ देऊन वेळेचा सदुपयोग करावा आणि tension कमी करण्यास थोडीशी स्वतः स्वतःला मदत करावी.

5. परीक्षा पुढे ढकलल्या मुळे कॉम्पिटिशन वाढेल का मेरीट high जाईल का

उ- होय अभ्यासाला  जास्त वेळ मिळाला आहे म्हणजे मेरिट high जाऊ शकते.covid-19 मुळे अनेक अर्थतज्ञ अभ्यासक म्हणतात जागतिक मंदी येऊ शकते आणि त्याचा जर भारतावर परिणाम झाला तर private sector चे job कमी होऊन ज्यांचे job गेले ते लोक secure option म्हणून govt. jobs ला प्राधान्य देऊ शकतात आणि येत्या 1-2 वर्षात स्पर्धा वाढू शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...