Thursday 30 July 2020

केंद्र सरकार 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करणार.

🔰अर्थमंत्रालयाने 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्याची योजना तयार केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली आहे.

🔰प्रस्तावानुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या 23 सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलांची खासगी क्षेत्राला विक्री केली जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे.

🔰2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 2.10 लक्ष कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.20 लक्ष कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधून तर 90 हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळतील.

🔴निर्गुंतवणूक म्हणजे काय?

🔰निर्गुंतवणूक म्हणजे सरकारच्या मालकी हक्कातल्या सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, प्रकल्प किंवा इतर मालमत्तेची विक्री करणे होय. सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या किंवा विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया चालवली जाते. आणि प्राप्त निधीतून इतर नियमित स्रोतांकडून होणाऱ्या महसुलातली तूट भरून काढता येते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...