Friday 12 November 2021

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट

▪️ कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन

▪️ जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे

▪️ भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स

▪️ कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा

▪️ ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड

▪️ कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण

▪️ इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी

▪️ कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ

▪️ कोणत्या संस्थेनी ‘डिजिटल इन इंडिया 2019’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ या कार्यक्रमाचे बोधचिन्ह चित्रित करण्याची स्पर्धा आयोजित केली?
उत्तर : पर्यटन मंत्रालय

▪️ कोणती व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमामध्ये भारताचे सदिच्छा दूत आहे?
उत्तर : दिया मिर्झा

▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा

▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया

▪️ कोणते राज्य सरकार “निगाह” योजना राबवत आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश

▪️ कोणत्या देशात परिवहन क्षेत्रात ‘वन्स इन ए जनरेशन’ गुंतवणूक योजनेची घोषणा केली गेली?
उत्तर : ब्रिटन

▪️ 2020 साली जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...