Sunday 5 July 2020

खासगी प्रवासी रेल्वेसेवा २०२३पासून.

➡️देशातील १०९ मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली. ‘मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.

➡️रेल्वे मंत्रालयाने बुधवारी १०९ रेल्वेमार्गावर १५१ रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला काँग्रेसने मात्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून लोक केंद्राला माफ करणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

➡️या रेल्वे १६ डब्यांच्या असतील व कमाल १६० किमी वेगाने धावतील. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रवास होऊ शकेल. रेल्वेचा चालक आणि गार्ड रेल्वे विभागांकडून दिले जातील. मात्र, गाडय़ांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपनीची असेल. पात्रता सिद्ध झालेल्या खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी नियुक्त रेल्वेमार्गाची जबाबदारी दिली जाईल. रेल्वेच्या एकूण प्रवासीसेवांमध्ये खासगी प्रवासी सेवांचे प्रमाण फक्त ५ टक्के असेल.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here