भारतीय संघाच्या क्रिकेट हंगामाची आज निश्चिती.

🔰करोनाची साथ वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील ११ मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होईल.

🔰भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आमर्यादित षटकांच्या तीन मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.

🔰आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे. परंतु करोनाची साथ नियंत्रणात न आल्यास संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेचाही विचार करता येईल. पण स्पर्धा देशाबाहेर गेल्यास खर्चही वाढेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...