Saturday 18 July 2020

आम्लवर्षा

________________________________________
◾️कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइड वातावरणात सोडली जातात.

◾️ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून
📌 सल्फुरिक आम्ल,
📌 नायट्रस आम्ल व
📌 नायट्रीक आम्ल तयार होते.

◾️ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

🔰 आम्लवर्षेचे परिणाम

📌  आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते.

📌 यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो.

📌 इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते.

📌 आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात.

📌 जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

________________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...