Sunday 23 August 2020

इट्रिअम



🍃जॉन गॅडोलीनला १७८९मध्ये गाडोलीनाइट खनिजाचे विश्लेषण करताना इट्रिअमचा शोध लागला.


🍀जॉन गॅडोलीनला १७८९मध्ये गाडोलीनाइट खनिजाचे विश्लेषण करताना इट्रिअमचा शोध लागला. स्विडनच्या इटर्बीनामक छोटय़ा नगरीवरून चार मूलद्रव्यांना नावे मिळाली त्यापकीच एक, संक्रमण धातूंच्या दुसऱ्या श्रेणीतील पहिले मूलद्रव्य – इट्रिअम! चंदेरी रंगाचे हे मूलद्रव्य रासायनिकदृष्टय़ा मात्र लँथेनाइड गणातील मूलद्रव्यांशी साधम्र्य दाखवते.

🌿 इट्रिअम निसर्गात मुक्त स्वरूपात आढळत नसून नेहमी इतर दुर्मीळ मृदा खनिजांबरोबर आढळते. अपोलो अभियानाच्या मोहिमेत चंद्रावरील खडकात इट्रिअम विपुल प्रमाणात आढळले होते.

🍀इट्रिअमवर ऑक्सिडेशनमुळे एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे सामान्य तापमानाला त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही, परंतु उच्च तापमानाला मात्र त्याचे ऑक्सिडीकरण होऊ शकते.

🍀४०० अंश सेल्सिअस तापमानाला चुऱ्याच्या स्वरूपातील इट्रिअम पेट घेऊ शकते.इट्रिअम ऑक्साइड या संयुगाचे अनेक उपयोग आहेत.

🌿 रगीत दूरचित्रवाणी संचाच्या टय़ूबसाठी लागणाऱ्या लाल फॉस्फरसच्या निर्मितीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. अ‍ॅल्युमिनिअम व मॅग्नेशिअमच्या संमिश्रात मजबुतीकरणासाठी इट्रिअम मिसळतात. धातू हे उष्णतेचे उत्तम वाहक असतात, परंतु अ‍ॅल्युमिनिअम, इट्रिअम व क्रोमिअम यांचे संमिश्र मात्र उष्णतेचे रोधक म्हणून कार्य करते.

🍀काचेला उष्णता व शॉक रोधक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...