Sunday 17 March 2024

'नेताजीं' च्या मृत्यूचं 'महागूढ' रहस्य...!



स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मृत्यू प्रकरण इतिहासातलं एक 'महागूढ' ठरलं आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शेवट कसा झाला? ते किती काळ जिवंत होते? याबद्दल आजही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. चला तर मग आज आपण नेताजींच्या महागूढ रहस्याबद्दल विचार करूयात...

नेताजीच्या विमान-अपघातातील निधनाची बातमी पहिल्यांदा 21 ऑगस्ट 1945 रोजी इंग्लंड आणि भारतात प्रसिद्ध झाली, तेव्हा उरुळीकांचनच्या निसर्गोपचार केंद्रात मुक्कामाला असलेल्या गांधीजींसह उभ्या देशात शोककळा पसरली होती.

नेताजींना सिंगापूर, सायगाव, तैपेई या मार्गाने मांच्युरियामधल्या डेरेन या गावी पोचायचे होते. तिथून मांच्युरियामधले त्यांचे मित्र त्यांना रशियापर्यंत सोबत असणार होते. त्याचदरम्यान विमान अपघात घडला.

अपघाताच्या वेळी नेताजींसोबत कर्नल हबीब-उर्-रहमान हे एकमात्र भारतीय साक्षीदार होते. नेताजींचं नेमकं काय झाले? या काळजीपोटी गांधीजींनी हबीब यांना अनेकदा चर्चेसाठी बोलावून घेतले होते.

कोलकता फायलीवरून असे स्पष्टच होते, की 1971 पर्यंत नेताजींच्या नातेवाईकांवर केंद्रीय गुप्तचरांचा पहारा होता, तर दुसरीकडे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू विविध राज्यांच्या यंत्रणांना अशी पत्रं लिहितात, 'नेताजींच्या माजी सैनिकांना सरकारमध्ये कुठंही जबाबदारीच्या नोकरीमध्ये घेऊ नका'.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुद्द गांधीजींनी नेताजींच्या विरोधात प्रचार केला होता, तरीही नेताजी मताधिक्‍याने निवडून आले होते.

एवढंच नव्हे तर, उत्तर प्रदेश या राज्यात तर 70 टक्के अधिक मते नेताजींना मिळाली होती. तेव्हा गांधीजींनी नेहरूंची आणि कृपलानींची जाहीर खरडपट्टी काढली होती. स्वातंत्र्यानंतर आपले अवघे जीवन राष्ट्राला समर्पित करणारा नेताजींसारखा नेता इथं सर्वोच्च स्थानी राहणं हे काळाचेच संकेत होते.

या संदर्भात कितीतरी प्राप्त-अप्राप्त, नष्ट केलेल्या कागदपत्रांनी या धक्कादायक रहस्याला वेगळे वळण दिले आहे. ताश्‍कंद कराराच्यावेळी रशियात लालबहादूर शास्त्री आणि नेताजी यांची भेट झाल्याचं शास्त्रीजींचे नातेवाईक आता जाहीरपणे बोलू लागले आहेत.

काही अभ्यासक असंही सांगतात, की एका अज्ञातस्थळी इंदिरा गांधी आणि नेताजी यांची भेट घडवण्यात आली होती, पण हुशारीनं त्या भेटीविषयी कोणत्याही लेखी नोंदी ठेवल्या गेल्या नाहीत.

परंतु, आज कुण्या बलाढ्य राष्ट्राच्या काटेरी कुंपणाने एक युद्धकैदी म्हणून त्यांना जखडून ठेवले होते, की राजकीय स्वार्थासाठी त्यांना ओलीस ठेवले होते? 1945 नंतर कसे होते त्यांचे जीवन? 'जसा आभाळात चंद्र, तसा आम्हा भारतीयांच्या हृदयात नेताजी! असे आचार्य अत्रे यांनी वर्णन केलेले नेताजी सुभाषचंद्र बोस!

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...