Sunday 17 March 2024

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे.

◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान या देशात करण्यात येणार आहे.

◆ कर्नाटक राज्याने माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता "ई-टेक्सटाईल" पोर्टल तयार करण्यात येत आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी ICICI बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे.

◆ भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे 'नवी दिल्ली' येथे सुरू झाला आहे.

◆ नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविला जाणार आहे.

◆ 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहेत.

◆ ICC ने क्रिकेट मध्ये 'स्टॉप क्लॉक' हा नियम 01 जून 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ जागतिक अध्यात्मिक महोत्सव 2024 तेलंगणा राज्यात आयोजित करण्यात येत आहे.

◆ हैद्राबाद येथे आयोजित जागतिक अध्यात्मिक महोत्सव 2024 चे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ जगातील पहिली 3 डी प्रिंटेड मस्जिद "सौदी अरेबिया" या देशात बांधण्यात आली आहे.

◆ मोहम्मद मुस्तफा यांची फिलिस्तीन देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ शरिंग तोग्बे हे 14 मार्च ते 18 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले भूतान या देशाचे पंतप्रधान आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...