Wednesday 2 September 2020

परधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण..🔰दशातल्या सामाजिक-आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलत “प्रधान मंत्री जन-धन योजना (PMJDY) - वित्तीय समावेशनासाठीचे राष्ट्रीय अभियान” सादर करण्यात आली. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट 2014 पासून केली जात आहे.

🔰वित्तीय उत्पादन आणि सेवा माफक दरात सर्वांना उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करणे तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग आणि व्यापकता वाढवणे, ही योजनेची उद्दिष्टे आहेत.

🔴ऑगस्ट 2020 पर्यंत योजनेच्या अंतर्गत झालेली कामगिरी...

🔰एकूण 40.35 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली. त्यापैकी ग्रामीण भागात 63.6 टक्के खाती उघडली गेली. महिलांच्या PMJDY खात्यांचे प्रमाण 55.1 टक्के आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी PMJDY खाती उघडण्यात आली.

🔰करियाशील PMJDY खाती यांच्या बाबतीत, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, PMJDY खात्यात दोन वर्षे व्यवहार झाला नाही. ऑगस्ट 20 मध्ये 40.05 कोटी PMJDY खात्यांपैकी 34.81 कोटी (86.3 टक्के) क्रियाशील आहेत.

🔰PMJDY अंतर्गत एकूण ठेवी 1.31 लक्ष कोटी रुपये इतक्या रकमेच्या आहेत.
PMJDY प्रती खाते सरासरी जमा 3,239 रुपये आहे. ऑगस्ट 15 पर्यंत प्रती खाते सरासरी जमा 2.5 पटीने वाढली आहे.

🔰PMJDY खातेधारकांना एकूण 29.75 कोटी रूपे कार्ड दिली गेली आहेत.जन-धन दर्शक ॲप हा देशात बँक शाखा, ATM, बँक मित्र, टपाल कार्यालये, यासारख्या बँकिंग टच पॉइंट अर्थात बँकेशी संबंधित सुविधा कुठे आहेत हे सांगणारा लोककेंद्री मंच आहे. GIS ॲपवर 8 लक्षाहून अधिक बँकिंग टच पॉइंट मॅप करण्यात आले आहेत.

🔰 5 किलोमीटरच्या परिसरात बँकिंग टच पॉइंट नसणारी गावेही या ॲप द्वारे ओळखून, तिथे बँक शाखा उघडण्यासाठी संबंधित SLBC केंद्रांद्वारे विविध बँकांना देण्यात येतात. या प्रयत्नामुळे बँक सुविधा नसणाऱ्या गावांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.

🔰वित्त मंत्र्यांनी 26 मार्च 2020 रोजी केलेल्या घोषणेनुसार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत, प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY) महिला खातेधारकांच्या खात्यात तीन महिने (एप्रिल 20 ते जून 20) या काळात दरमहा 500 रुपये जमा करण्यात आले. एप्रिल ते जून 20 या काळात PMJDY महिला खातेधारकांच्या खात्यात एकूण 30,705 कोटी रुपये जमा करण्यात आले.

🔰विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत 8 कोटी PMJDY महिला खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरण लाभ मिळायची माहिती बँकांनी दिली आहे. थेट लाभ हस्तांतरण विफल होण्याचे प्रमाण घटून एप्रिल 2019 मधल्या 5.23 लक्ष (0.20 टक्के) वरून जून 2020 मध्ये 1.1 लक्ष (0.04 टक्के) झाले.

🔰पढच्या काळात सूक्ष्म विमा योजनेच्या अंतर्गत PMJDY खातेधारकांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने 10 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMJJBY तर 25 टक्के पात्र PMJDY खातेधारक PMSBY अंतर्गत आणण्यात येणार आहे. PMJDY खातेधारकांमध्ये देशभरात स्वीकृत पायाभूत ढाचा निर्माण करून त्याद्वारे रूपे सह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाणार आहे.


🔰तसेच फ्लेक्सी आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत गुंतवणूक आणि सूक्ष्म पत PMJDY खातेधारकांच्या आवाक्यात येण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...