Saturday 3 October 2020

दाजीपूर अभयारण्य



दाजीपूर एक छोटस, इवलस नाव परंतु या दाजीपूरात रम्य, दाट कीर्द झाङी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि  पक्षी पाहिले कि, या आरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते.हे या गावाचे वैशिष्ट.

कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान कोल्हापूर सावंतवाडीच्या हमरस्त्यावर एकाकी झालेल हे गांव गेल्या कांही दिवसापासुन पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या कित्येक वर्षात गवारेडा हा हुम दांडग्या परंतु वैशिष्ट्यपुर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे.

या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो त्याचबरोबर हरिण,सांबर,चितळ यांचे कळप ही दिसतील,कधी कधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे चाललेले ठसे दिसतील.

जंगलात साळींदर,अस्वले,साप,नाग यांची ही रेलचेल सुरूच असते.महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याक़डे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे.त्याबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणुन लक्ष केंद्रीत केले आहे.येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणुन रूपांतर केले आहे.पर्यटकांसाठी तंबु निवास सुविधा केली आहे.भोजन उपहार गृहे याचीही स्वंतंत्र व्यवस्था आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या थेट गाड्या कोल्हापूर ते दाजीपूर येथे पर्यंत जातात.तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही स्वंतंत्र खास गाड्यांची व्यवस्था केली आहे.

राधानगरी जलाशयाचा नैसर्गिक उपयोग करून अद्यावत असे विश्रामगृह उभारण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा गगनगिरी महाराज मठ याचा भाग असुन ३७२ स्क्वेअर मिटरचा हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...