Saturday 3 October 2020

नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती



1. नाशिक जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक      

       क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.


लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा. 


सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.


जिल्हा विशेष -


हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. 


नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्‍यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.


प्रमुख स्थळे


नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे. 


महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे. 


त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे. 


मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. 


येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. 


सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. 


भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान. 


नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे. 


भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर. 


देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. 


गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण. 


सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात. 


सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध. 


दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध. 


निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)


महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक 


महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक 


चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक 


नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते. 


नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.


नाशिक जिल्ह्यात वाहणार्‍या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्‍या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे. 


भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे. 


2. धुळे जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे           

     क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.


सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले. 


प्रमुख स्थळे


धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत. 


शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे. 


दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे. 


3. नंदुरबार जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार             


क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).


सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात. 


सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला. 


या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.


प्रमुख स्थळे


नंदुरबार - येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्‍या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे. 


प्रकाशे - येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात. 


धडगाव - हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. 


तोरणमाळ - प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण. 


भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2006 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात बर्ड फ्ल्यू या विषाणूजन्य (एच-5, एन-1) आजाराची कोंबड्यांना लागण झाली. 


नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची 60 टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 


तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. 


महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. 


धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला आहे. 


महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर (धुळे)


4. जळगाव जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव         

    क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी 


लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड. 


सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.


जिल्हा विशेष -


पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार, अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.


प्रमुख स्थळे -


जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. 


अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे. 


भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे. 


चाळीसगांव - प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते. 


जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे. 


चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे. 


पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. 


कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे. 


उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे. 


पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात आहे. 


महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहेत. 


पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.


जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे. 


यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. 


चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.


 


5. अहमदनगर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अहमदनगर       

     क्षेत्रफळ - 17,048 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 14 - कोपरगाव, आकोले, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता. 


सीमा - उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.


जिल्हा विशेष -


अहमदनगर हे शहर सन 1418 मध्ये मलिक अहंमद यांनी बसविले. मलिक हमदच्या नावावरून ते अहमदनगर म्हणून ओळखले जावू लागले. हे निजामशाही राजधानीचे शहर म्हणून ओळखतात. 


शहराच्या चारही बाजूंनी खंदक असलेला भुईकोटा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 


साखर कारखान्यांचा जिल्हा, खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म.

या जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.


प्रमुख स्थळे


अहमदनगर - शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे. 


अकोले - येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे. 


प्रवरानगर - देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.


नेवासे - येथेच संत ज्ञांनेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' सांगितली. 


राहुरी - महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे. 


शनि-शिंगणापुर - शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.


राळेगण सिद्धी - थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे. 


शिर्डी - साईभक्ताचे श्रद्धास्थान 


सिद्धटेक - येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते. 


भंडारदारा - अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर 'भंडारदरा' हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...