Sunday 11 October 2020

ब्रिटिशांनाही लुटता न आलेले भारतातील रहस्यमयी खजाने



एक काळ होता जेव्हा भारतातुन सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. हा धूर पाहूनच किंवा त्याच्याबद्दल ऐकूनच अनेक परदेशी लोकांनी भारतात येऊन कधी तलवारीच्या तर कधी बंदुकीच्या जोरावर आपले खजिने लुटले.*

 भारतातला खजिना चोरून आपापल्या देशात श्रीमंती आणि प्रतिष्ठा मिळवली. परंतु आजही भारतात असे अनेक खजिने आहेत जे ब्रिटिशांनाही लुटता आले नाहीत.

त्याकाळचे अनेक राजे, संस्थानिक किंवा शासक आपले खजिने वाचवण्यासाठी त्याबद्दलची माहिती गुप्त ठेवत असत किंवा त्यांच्याबद्दल दंतकथा पसरवत असत. पाहूया त्यापैकी काही गुप्त खजिने आणि दंतकथांबद्दल…


◾️ नादीरशहाचा खजिना 


नादिरशाहने १७३९ मध्ये भारतावर आक्रमण करून दिल्लीवर ताबा मिळवला होता त्यावेळी त्याने संपूर्ण दिल्ली लुटली होती. त्या लुटीमध्ये प्रसिद्ध मयूरसिंहासन आणि कोहिनुर हिऱ्यासोबतच मोठ्या प्रमाणावर सोने, नाणी आणि दागिन्यांचा समावेश होता. तेव्हा युद्धपरिस्थी असल्याने नादिरशहा आपल्या खजिन्यावर लक्ष ठेऊ शकला नाही. परत जाताना त्याच्या सैन्यातील मोठ्या सरदार आणि सैनिकांनी त्या लुटीतला मोठा खजिना लपवून ठेवला होता अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. हा खजिना अद्याप कुणाला सापडला नाही.


◾️ कष्णा नदीचा खजिना 


आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कृष्णा नदीचा किनारी प्रदेश बऱ्याच काळापासून हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. एकेकाळी हा प्रदेश गोवळकोंडा राज्यात समाविष्ट होता. जगप्रसिद्ध कोहिनुर हिरा इथल्याच खाणीतून काढण्यात आला होता.


◾️ बिंबीसारचा खजिना


इ.स.पूर्व पाचव्या शतकातील मगधचा राजा (बिहार) बिंबिसार याला मौर्य साम्राज्याचा जनक मानले जाते. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की बिहारच्या राजगीर येथे बिंबिसाराचा खजिना लपविण्यात आला होता. एकाच दगडात कोरलेल्या सोनभांडार गुहांमध्ये पुरातन लिपीमध्ये लिहलेले शब्द अद्याप कुणाला वाचता आले नाहीत. असे मानले जाते की त्या लिपीतच खजिन्याशी संबंधित नकाशाचे रहस्य लपले आहेत. ब्रिटिशांनी खजिना शोधण्यासाठी तोफा लावल्या परंतु त्यांनाही खजिना सापडला नाही.

आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,


◾️ जहांगीर बादशहाचा खजिना


मुघल बादशाह जहांगीरला सत्तेतून पायउतार केल्यानंतर तो दिल्लीपासून १५० किमी अंतरावर असणाऱ्या राजस्थानमधील अलवर किल्ल्यात आश्रयाला गेला होता. दंतकथेनुसार जहांगीरने अलवरच्या किल्ल्यात राहायला येताना आणलेली प्रचंड संपत्ती त्याने किल्ल्यात लपवली. ही संपत्ती अद्याप कुणाला सापडली नाही.


◾️शरी मोक्काम्बिका मंदिर खजिना 


कर्नाटकच्या पश्चिम घाटात कोलूर येथे श्री मोक्काम्बिका मंदिर आहे. इथल्या पुजाऱ्यांच्या सांगण्यांनुसार मंदिरात सापाचे खास चिन्ह बनवलेले आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,प्राचीन काळापासून नागदेवता लपवलेल्या खजिन्याचे रक्षण करतात असे भारतात मानले जाते. या मंदिराच्या तळघरात प्रचंड संपत्ती असल्याचे बोलले जाते. त्यांच्या रक्षणासाठीच सापाचे चिन्ह तिथे कोरण्यात आले आहे. मात्र या संपत्तीचा शोध किंवा किती संपत्ती आहे याचा कुणालाही अंदाज लागला नाही.


◾️ राजा मानसिंहाचा खजिना


जयपूरचा राजा मानसिंह हा मुघल सम्राट अकबराचा सरसेनापती होता. १५८० मध्ये त्याने अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी त्या विजयानंतर मिळालेली लूट मानसिंहाने सरकारदरबारी जमा न करता गुप्त ठिकाणी लपवली होती अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा किती तथ्य आहे याचा अंदाज यावरून होतो की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी हा खजिना शोधण्याचे आदेश दिले होते. पण हा खजिना काय सापडला नाही.


◾️ मीर उस्मान अलीचा खजिना 


हैद्राबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. १९३७ मध्ये प्रतिष्ठित अशा टाईम मॅगझीनमध्ये त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितले होते. आपल्या शासनकाळात त्याने भरपूर प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की, किंग पॅलेसच्या तळघरात त्याने आपली सगळी संपत्ती लपवली होती. त्यात महागडे हिरे, दागिने, रत्ने समाविष्ट होती. मीर उस्मान अलीच्या मृत्युसोबतच त्याच्या खजिन्याचे रहस्य गडप झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...