Wednesday 19 June 2024

भारतातील महाजनपदे

Mpsc History

भारतातील महाजनपदे:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :

आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे.

भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजपदकालीन राज्यव्यवस्था :

महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे.

गणपरिषद – ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे.

कार्यकारी मंडळ – राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे.
सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पराक्रमी राज्ये :

कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले.
या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली.
कोशल – हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय.
साकेत ही या राज्याची राजधानी होती.

कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले.
वत्स – अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते.

अवंती – आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते.
मगध – गंगा व शोण नदीच्या खोर्‍यातील परीसरात मगध राज्य पसरले होते.

बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बिंबिसार :

बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अजातशत्रू :

हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली.
या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.

शिशुनाग :

या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :

या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता.

या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय.
नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परकीय आक्रमणे :

भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.

प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.

भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.

इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :

मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.

भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :

ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.

मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...