Tuesday 24 November 2020

भारताची IRNSS प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनला


🔰हिंद महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेनी (IMO) “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याच्या एका घटकाच्या रूपात स्वीकारले आहे.


🔰“वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनल्यामुळे ही प्रणाली 50°N अक्षांश, 55°E रेखांश, 5°S अक्षांश आणि 110°E रेखांश, जे भारतीय सीमेपासून अंदाजे 1500 किलोमीटरपर्यंत आहे, एवढ्या क्षेत्रात व्यापलेल्या महासागराच्या जलक्षेत्रामध्ये जहाजांच्या सुचालनामध्ये सहाय्य करण्यासाठी ठिकाणाची माहिती मिळविण्यासाठी GPS आणि GLONASS प्रणाली प्रमाणेच IRNSS वापरण्यास व्यापारी जहाजांना सक्षम करणार.


🌍भारताची ‘NavIC’ प्रणाली


🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारतासाठी ‘NavIC’ (नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन) नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे. या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे.


🔰‘NavIC’ प्रणाली ही अमेरिकेच्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली’ (इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जात आहे.


🔰IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.


🔰IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करते - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).


🔰ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करते. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणार्‍या मच्छीमारांना त्याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...