Tuesday 24 November 2020

पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “TX2 पुरस्कार” मिळाला



✍️उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि उत्तरप्रदेश वन विभागाने आंतरराष्ट्रीय किर्तीचा “TX2 पुरस्कार” जिंकला.


🔴 ठळक बाबी....


✍️कवळ 4 वर्षांमध्ये वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे.पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात केवळ 4 वर्षांमध्ये 40 वाघांची वाढ झाली.पिलीभीत व्याघ्र प्रकल्प उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत आणि शाहजहांपूर या जिल्ह्यांमध्ये आहे.भारतात एकूण 13 व्याघ्र प्रकल्प आहेत.


🔴 “TX2 पुरस्कार” विषयी...


✍️TX2 पुरस्काराची स्थापना 2010 साली झाली. हा एक वार्षिक पुरस्कार आहे.वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठणाऱ्याचा सन्मान करण्याच्या हेतूने या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.


✍️सयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP), ग्लोबल टायगर फोरम (GTF), आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN), वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF), कन्झर्व्हेशन अश्यूअर्ड/टायगर स्टँडर्ड्स आणि लायन्स शेअर या संघटना पुरस्काराचे भागीदार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...