Tuesday 24 November 2020

राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचा 72 वा वर्धापनदिन साजरा



🔰 जगातली सर्वात मोठी गणवेषधारी युवा संघटना असणारी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी 72 वा वर्धापनदिन साजरा केला.


📌 ठळक बाबी 


🔰 वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय युध्द स्मारकावर जाऊन आदरांजली वाहून करण्यात आली. राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचे उपव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी सर्व विद्यार्थीसैनिक बांधवांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले.


🔰 NCC वर्धापनदिन भारतभर विद्यार्थीसैनिक रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.


🔰 यावर्षी विद्यार्थीसैनिक आणि त्यांच्या सहकारी NCC अधिकाऱ्यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत', 'आत्मनिर्भर भारत', 'फिट इंडिया', 'स्वच्छता अभियान', 'प्रदूषण महापंधरवडा', अशा मोहिमांचे नेतृत्व केले तसेच विविध सरकारी उपक्रम उदाहरणार्थ, 'डिजिटल साक्षरता', 'आंतरराष्ट्रीय योगदिन', वृक्षारोपण आणि 'लसीकरण मोहीम' यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

देशाच्या सीमावर्ती आणि किनारपट्टीच्या भागात NCC या योजनेचा विस्तार करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 15 ऑगस्‍ट 2020 रोजी जाहीर केली. त्यामुळे तेथील युवा वर्गाला सशस्त्र सैन्य दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळण्यास मदत होणार.


📌 राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) विषयी 


🔰 राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या तरुणांना शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे. NCC ची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. दरवर्षी NCC कडून मुली तसेच मुलांसाठी पर्वतारोहण आणि इतर छोट्या स्वरूपाच्या मोहिमा आयोजित केल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...