Tuesday 24 November 2020

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती


⚡️ कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तर काही कंपन्यांना टाळंही लागलं आहे. 


💁‍♂️ दसऱ्या बाजूला काही कंपन्यांना लॉकडाउनच्या काळात मोठी उभारी मिळाल्याचंही पाहायला मिळत आहे.


👉 सपेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. 


😳 विशेष म्हणजे एलन मस्क यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुगरबर्ग यांना मागे टाकलं आहे.


😍 बलूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडे ११० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग १०४ अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.


👀 *जगभरातील टॉप १० श्रीमंत व्यक्ती* : 

१. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस : १८५ अब्ज डॉलर

२. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स : १२९ अब्ज डॉलर

३. टेस्ला, स्पेस एक्सचे एलन मस्क : ११० अब्ज डॉलर

४. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग : १०४ अब्ज डॉलर

५. एलवीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट : १०२ अब्ज डॉलर

६. बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट : ८८ अब्ज डॉलर

७. गुगलचे के लैरी पेज : ८२.७ अब्ज डॉलर

८. गुगलचे सर्जी ब्रिन : ८० अब्ज डॉलर

९. मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बॉलमर : ७७.५ अब्ज डॉलर

१०. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी : ७५.५ अब्ज डॉलर

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...