Tuesday 24 November 2020

जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट”


🔰दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर प्रदेशातले चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्याच्या हेतूने 17 नोव्हेंबर 2020 रोजी जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दरम्यान “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट” नामक एक करार झाला.


🔰करारामुळे जपानी आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्य दलांना परस्परांच्या देशांची भेट घेण्यास तसेच प्रशिक्षण व संयुक्त मोहिमा आयोजित करण्याची परवानगी मिळते.


🔴दक्षिण चीन समुद्र...


🔰दक्षिण चीन समुद्र हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत. नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृध्द साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर आपला दावा करीत आहे.


🔴परशांत महासागर...


🔰परशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 32 टक्के भाग व्यापला आहे व जगातले एकूण पाण्याच्या 46 टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...