Wednesday 20 January 2021

इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ याची द्वितीय आवृत्ती नीती आयोगाकडून प्रकाशित


🎍नीती आयोगाने 20 जानेवारी 2021 रोजी एका आभासी कार्यक्रमात ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केली.


🌹मानांकन यादीनुसार निष्कर्ष


🎍कर्नाटकने मोठ्या राज्यांच्या गटात पहिले स्थान कायम राखले. महाराष्ट्र एका स्थानाने वर आला आणि द्वितीय क्रमांकावर आहे, तर तामिळनाडू तिसर्‍या क्रमांकावर आहे.


🎍ईशान्य आणि डोंगराळ राज्यांच्या गटात, हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याच्यापाठोपाठ उत्तराखंड व मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो.


🎍कद्रशासित प्रदेश व छोट्या राज्यांच्या गटात, दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे, तर चंदीगडने द्वितीय क्रमांक कायम राखला आहे.


🌼निर्देशांकाविषयी


🎍हा निर्देशांक देशाला नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याप्रति सरकारची वचनबद्धता दर्शवते.


🎍‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ नाविन्यपूर्ण संशोधनाला हातभार लावण्याच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरवते आणि त्यांची ताकद व त्रुटी अधोरेखित करुन अभिनवता धोरण सुधारण्यासाठी त्यांना सक्षम बनवते.


🎍कामगिरीची प्रभावीपणे तुलना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 17 ‘प्रमुख राज्ये’, 10 ‘ईशान्य आणि पर्वतीय राज्ये’ आणि 9 ‘शहर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश’ अश्या गटांमध्ये विभागले आहे.


🎍राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिणाम आणि प्रशासन या दोन व्यापक श्रेणींच्या आधारे मानांकन देण्यात आले आहे. एकूणच, निर्देशांकाच्या चौकटीत 36 निर्देशकांचा समावेश आहे.


🎍निर्देशांक कल स्वीकारून देश, राज्य आणि जिल्हा पातळीवर नवसंशोधनाला प्रेरक विविध घटकांचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करतो. ही विश्लेषणे राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर नवसंशोधनाचे उत्प्रेरक आणि प्रतिबंधकांना ओळखण्यात धोरणकर्त्यांना मदत करतील, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...