Wednesday 20 January 2021

भारतीय महिला हॉकी संघाची अर्जेटिनाशी बरोबरी.


🧿शर्मिला देवी आणि दीप ग्रेस इक्का यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेटिनाच्या कनिष्ठ संघाविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली.


🧿अर्जेटिना दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. भारताची युवा आघाडीवीर शर्मिला हिने २२व्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर पावला सान्तामारिना हिने २८व्या मिनिटाला अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी दीप ग्रेस हिने भारताला पुन्हा आघाडीवर आणले. पण ब्रिसा ब्रगसेर हिने ४८व्या मिनिटाला अर्जेटिनासाठी दुसरा गोल करत हा सामना बरोबरीत राखला.


🧿करोनामुळे वर्षभरानंतर मैदानात उतरून चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच कालावधीनंतर आम्ही पहिला सामना खेळलो. सर्वानाच प्रतिस्पध्र्याशी दोन हात करण्याचा सराव व्हावा म्हणून आम्ही २३ खेळाडूंना मैदानावर उतरवले.’’

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...