Tuesday 5 January 2021

कोची-मंगळुरू नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” देशाला समर्पित करणार आहेत.


ठळक बाबी


हा कार्यक्रम ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ निर्मितीच्या दिशेने ठरवलेला महत्वपूर्ण टप्पा आहे.

ही 450 किलोमीटर लांबीची पाईपलाईन गेल इंडिया लिमिटेड या कंपनीने तयार केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये इतकी होती.


दररोज 12 दशलक्ष मेट्रीक स्टँडर्ड क्यूबिक मीटर इतकी वाहतूक करण्याची याची क्षमता आहे.

पाईपलाईनद्वारे कोची (केरळ) येथील रिगॅसिफीकेशन टर्मिनल पासून एरनॅक्यूलम, थ्रीसूर, पलक्कड, मल्लपूरम, कोझिकोडी, कन्नूर आणि कासारगोड या जिल्ह्यांमधून जात मंगळुरू (कर्नाटकातला दक्षिण कन्नड जिल्हा) पर्यंत द्रव नॅचरल गॅस (LNG) नेला जाणार.


या पाईपलाईनमुळे घराघरांत पर्यावरण अनुकूल आणि परवडणारे इंधन पाईप नॅचरल गॅस स्वरूपात पुरविण्यात येणार असून वाहतूक क्षेत्राला काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस मिळणार. तसेच या पाईपलाईनवरून जिल्ह्यांतील व्यावसायिक आणि औद्योगिक घटकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होणार. अशा स्वच्छ इंधनाच्या वापराने वायूप्रदूषणाला आळा बसून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होणार.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...