Tuesday 5 January 2021

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.


🔰भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे जी संपूर्ण जगात कुठल्याही देशानं अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’  बनवली आहे.


🔰भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या या ट्रेनचं नाव ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ असं ठेवण्यात आलं आहे.


🔰‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. 


🔰यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.तर विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये  रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे.


🔰कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत. यात रेल्वे स्थानकांवर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र यासह अनेक सुविधांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...