Saturday 9 January 2021

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षा ३ जुलैला होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा.


🔰‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ परीक्षेच्या तारेख संदर्भात आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार ३ जुलै २०२१ रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. यावेळी पोखरियाल यांनी आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता आणि नियमांबाबत देखील माहिती दिली.


🔰दशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या घोषणेची प्रतीक्षा होती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’  परीक्षा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.


🔰या परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना पोखरियाल यांनी सांगितले की, आपण अद्याप पूर्णपणे करोनाच्या संकटातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. याची विद्यार्थ्यांना मदत होईल. आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 13 JUNE 2024

1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स' मध्ये भारत 129 व्या स्थानावर पोहोचला आहे. 2) दरवर्षी 13 जून रो...