Saturday 9 January 2021

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची परवानगी.


🔰महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने गुरुवारी परवानगी दिली.


🔰या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. करोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.


🔰सरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-१९ करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले.


🔰‘‘शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही आयोजनाचे धोरण ठरवू,’’ अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...