Thursday 28 January 2021

सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी बनली मुख्यमंत्री; सरकारी योजनांचा घेतला आढावा.✴️राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी, सृष्टीने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजानांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.


✴️दशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.


✴️हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद विकासखंडच्या दौलतपुर गावातील असलेली सृष्टी गोस्वामी २०१८ मध्ये बाल विधानसभेत बाल आमदार म्हणून देखील गेलेली आहे. तसेच, २०१९ मध्ये सृष्टीने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशीपसाठी थायलंडमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून सृष्टी ‘आरंभ’ ही योजना चालवत आहे. यामध्ये परिसरातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचं काम केलं जातं.


✴️सष्टी रुडकी येथील बीएसएम पीजी महाविद्यालयाची बीएससी अॅग्रीकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील प्रवीण पुरी हे गावात किराणा दुकान चालवतात. तर आई सुधा गोस्वामी या अंगणवाडी कार्यकर्ता आहेत. छोटा भाऊ श्रेष्ठ पुरू इयत्ता अकारावीचा विद्यार्थी आहे. सृष्टीचा सर्व गावाला अभिमान आहे, असं तिच्या वडिलांना म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...