Thursday 28 January 2021

भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लसजगातील सर्वात मोठ्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली. यामध्ये अमेरिका, युके, फ्रान्सलाही भारतानं मागे टाकलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात एकूण २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे.


 अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. 


आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...