Thursday 28 January 2021

अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर


🔰एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कसोटी अजिंक्य स्पर्धा (World Test Championship) सुरू करण्यात आली. या स्पर्धेची रूपरेषा जाहीर करतानाच स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर १० ते १४ जून या दरम्यान खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होते. पण ICCने आता अंतिम सामना पुढे ढकलला असून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.


🔰ICCच्या महत्त्वाकांक्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवरच होणार आहे. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार हा सामना १० ते १४ जूनऐवजी आता १८ ते २२ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. IPL 2021 चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे BCCIच्या विनंतीला मान देत ICCने अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे.


🔰नव्या नियमांनुसार हल्ली एका देशातून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास क्वारंटाइनचा नियम लागू होतो. ७ ते १४ असा विविध ठिकाणी हा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच IPL स्पर्धेत पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांचे खेळाडू खेळतात. त्यामुळे कोणतेही दोन संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पोहोचले तरी त्या संघातील खेळाडूंना क्वारंटाइन आणि सरावाला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने अंतिम सामना पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ICCने अंतिम सामना पुढे ढकलला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...