Friday 26 February 2021

करोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सावध! महाराष्ट्रासह सहा राज्यात केंद्रीय पथकं.



तब्बल आठ ते दहा महिन्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच करोनाचं संकट पुन्हा उभं राहताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये करोना बळावताना दिसत आहे. दररोज येणाऱ्या करोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारही सावध झालं आहे. करोना उद्रेक रोखण्यासाठी आणि उपाययोजनासाठी केंद्रानं पथकं नियुक्त केली असून, ही पथकं राज्यांना मदत करणार आहे.


महाराष्ट्रासह करोनाचं संक्रमण वाढलेल्या राज्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्रानं तीन सदस्यीय पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश केलेला असून, ही पथकं राज्यांना करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणार आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचं नेतृत्व करणार असून, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि जम्मू व काश्मीरमध्ये विशेष लक्ष देणार आहेत, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...