Saturday 27 February 2021

सर्वच भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याचा सरकारचा विचार



महाराष्ट्रातील विविध विभागातील रखडलेल्या नोकरभरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून केवळ क्लासवन अधिकारीच नाही तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत मार्फत घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात विविध विभागांच्या सचिवांची बैठक बोलविली आहे.


सध्या आयोगामार्फत वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचीच निवड केली जाते तर अराजपत्रित ब, क आणि ड संवर्गातील पदांची भरती दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जात असून यापुढे ही भरती निवड मंडळांऐवजी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा सरकाराच प्रस्ताव विचाराधीन असून कोणत्या संवर्गांची नोकरभरती आयोगामार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले असून त्या अनुषंगानेच फेब्रुवारी महिन्यातच मुख्य सचिव सदरील बैठक घेणार आहेत.


यापूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त हे असतात आणि या दुय्यम निवड मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलीकडेच तीन कंपन्यांची नव्याने नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली असली तरी मात्र विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारीतील निवड प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here