Monday 1 February 2021

भारतात मनुष्यबळाची अफाट क्षमता- बिल गेट्स


🔰‘‘भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट  शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो’’, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले.


🔰करोना साथीने मानव जातीला किती हादरा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, की करोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही.


🔰पढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा करोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही.  औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे. त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यांची उदाहरणे....

**संघ                       उदाहरणे ..........…....................................... 1)पोरीफेरा   -  स्पंज, सायकॉन, ( रंध्री )        ...