०१ फेब्रुवारी २०२१

महत्त्वाच्या म्हणी व अर्थ



चढेल तो पडेल------

उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही



चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही------

काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत



चांभाराच्या देवाला खेटराची पूजा------

जशास तसे या न्यायाने वागणे चांगले



चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला------

क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च



चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे------

प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच



चालत्या गाडीला खीळ घालणे------

व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे



चिंती परा ते ये‌ई घरा------

दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते



चोर तो चोर वर शिरजोर------

गुन्हा करुन वर मुजोरी



चोर सोडून संन्याशाला फाशी------

खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे



चोराच्या उलट्या बोंबा------

स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे



चोराच्या मनात चांदणे------

वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे



चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक------

वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात



चोराच्या हातची लंगोटी------

ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब



चोराला सुटका आणि गावाला फटका------

चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे



चोरावर मोर------

एकापेक्षा एक सवाई



चोरीचा मामला हळू हळू बोंबला------

पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...