Saturday 24 July 2021

पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय



💢सध्या संपूर्ण जगभरात पेगॅसस प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करत जगातील एकूण १२ राष्ट्रपमुखांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. 


💢याशिवाय काही माजी पंतप्रधान आणि एका राजाचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्षांच्या यादीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करत असते.


💢दरम्यान पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपला मोबाइल आणि मोबाइल क्रमांक बदलला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेगॅसस प्रकरणविरोधात फ्रान्स सरकारकडून घेण्यात आलेला हा पहिला मोठा निर्णय आहे.


💢"त्यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर पाळत ठेवली नाही असा नाही. हा फक्त अतिरिक्त सुरक्षेचा भाग आहे," असं अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं आहे. 


💢सरकारचे प्रवक्ते गॅब्रियल यांनी पेगॅसस प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचं म्हटलं आहे.

मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. 


💢परिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.


💢पगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. 


💢सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.

एकदा पेगॅससने तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव केला की ते सतत पाळत ठेवू शकतं.


💢 वहॉट्सअॅपसारख्या अॅपमधून करण्यात आलेले चॅटही ते पाहू शकतात. सुरक्षा तज्ज्ञांनुसार, पेगॅसस मेसेज वाचू शकतं तसंत कॉलही ट्रॅक करु शकतं. याशिवाय अॅप्सचा वापर, त्यात होणाऱ्या घडामोडी, लोकेशन डेटा, व्हिडीओ कॅमेराचा ताबा मिळवणे, मायक्रोफोनच्या सहाय्याने संभाषण ऐकणं या गोष्टीही शक्य आहेत.


💢दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर करत असल्याचा कंपनीचा दावा

हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे असा इस्त्राईलच्या कंपनीचा दावा आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...