Saturday 24 July 2021

ग्वाल्हेर आणि ओरछा या शहरांचा UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत समावेश🌹21 जुलै 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर (किंवा ग्वालियर) आणि ओरछा या ऐतिहासिक शहरांमध्ये विकास कार्यांचे उद्घाटन झाले.


🌹परकल्पाच्या अंतर्गत चालणारी कार्ये UNESCO संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार आणि मध्य प्रदेश सरकार संयुक्तपणे चालविणार आहेत.


प्रकल्पाविषयी


🌹सस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांच्या समावेशक व सुनियोजित विकासासाठी 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' या अंतराष्ट्रीय प्रकल्पाचा 10 नोव्हेंबर 2011 रोजी प्रारंभ करण्यात आला आहे.


🌹'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप' दृष्टिकोन मानवी, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मुख्य संपदा म्हणून सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशीलता लक्षात घेतो आणि भौतिक व सामाजिक परिवर्तनांचे व्यवस्थापन करण्यासाठी साधने प्रदान करतो.


🌹वर्तमानात, UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत दक्षिण आशियातील 8 शहरांची निवड केली गेली आहे. 


🌹तयात अजमेर (राजस्थान), वाराणसी (उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर आणि ओरछा (मध्य प्रदेश) या चार भारतीय शहरांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...