Tuesday 24 August 2021

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.



🔰अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे.


🔰गल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.


🔰“अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणं गरजेचं आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...