Tuesday, 13 December 2022

भारतीय राज्यघटना निर्मितीबाबत काही महत्वपूर्ण माहिती

🔸भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते.


★कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


🔸मळ राज्यघटना छापील नव्हती .

 ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


🔸परसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.


🔸वदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चित्रित करण्यात आले  आहे.


🔶26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर सदस्यांनी स्वाक्षरी केल्या.


२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या उर्वरित सर्व २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...