Wednesday 10 November 2021

स्वयंसहाय्यता गटातील महिलांना ‘लखपती’ करण्याचा ग्रामीण विकास मंत्रालयाचा उपक्रम

🔰महिलांना उच्च आर्थिक व्यवस्थेकडे नेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयंसहाय्यता गटातील गटातील महिलांना ‘लखपती’ करण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे.

🔰या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता गटातील ग्रामीण महिलांना वार्षिक किमान 1 लक्ष रुपये कमावता येईल. या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी, मंत्रालयाने पुढील दोन वर्षांत स्वयंसहाय्यता गटातील 25 दशलक्ष ग्रामीण महिलांना उपजीविकेसाठी मदत पुरवण्याची कल्पना मांडली आहे.

🔰कृषी आणि संलग्न, पशुधन, NTFP (लाकूड नसलेली वन उत्पादने) आणि अभिसरणाद्वारे इतर उपाययोजनाच्या माध्यमातून घरगुती स्तरावर शाश्वत आधारावर वार्षिक 1 लक्ष रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी उपजीविकेच्या कामांमध्ये विविधता आणण्यासाठी सुनियोजित उपायांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

🔰बचत गट, ग्रामसंस्था आणि CLF (क्लस्टर लेव्हल फेडरेशन्स) यांना या प्रकारच्या उपक्रमांना मदत करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात प्रशिक्षित बचत गटसदस्यांचे समर्पित समुदाय गट त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील.

🅾पार्श्वभूमी

🔰राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान संपृक्ततेच्या दृष्टिकोनानुसार काम करते. आजपर्यंत, 7.7 कोटी महिलांना 70 लक्ष बचत गटांमध्ये एकत्र आणून 6768 प्रभागात अभियानाशी जोडण्यात आले आहे. बचत गटांना प्रारंभिक भांडवल सहाय्य देण्यासाठी वार्षिक सुमारे 80 हजार कोटी रुपये जमा केले जात आहेत. या अभियानाच्या अंतर्गत, वर्ग आणि जातीच्या विविध विभागातील गरीब स्त्रियाना बचत गट आणि त्यांच्या महासंघांमध्ये सामावून घेतले जात आहे आणि हे गट त्यांच्या सदस्यांना त्यांचे उत्पन्न आणि जीवनमान वाढवण्यासाठी वित्तीय, आर्थिक आणि सामाजिक विकास सेवा पुरवतात.

🔰दीनदयाल अंत्योदय योजना ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी ग्रामीण गरीबांना स्वयंशासित संस्थांमध्ये संघटित करते आणि ग्रामीण गरीब महिलांसाठी क्षमता निर्मिती आणि विविध उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर भर देते.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...