Wednesday 12 January 2022

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा 'भाषा संगम' उपक्रम.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2021 रोजी शाळांसाठी 'भाषा संगम' उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

🔰ठळक बाबी

हा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत 22 भारतीय भाषांमध्ये दैनंदिन वापरातील मूलभूत वाक्ये शिकवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे.

लोकांनी त्यांच्या मातृभाषेशिवाय इतर भारतीय भाषेतील मूलभूत संभाषण कौशल्ये आत्मसात करावीत ही त्यामागची संकल्पना आहे.
या कार्यक्रमाची रचना आणि विकास राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) याने केले आहे.

🔰शालेय विद्यार्थ्यांसाठी हा असा एक उपक्रम जो दिक्षा (DIKSHA), ई-पाठशाला (ePathshala) या मंचावरून आणि 22 पुस्तिकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे.

त्याव्यतिरिक्त, ‘भाषा संगम’ मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे, जो MyGov कडून समार्थित शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचा एक उपक्रम आहे. ते अॅप मल्टीभाषी या स्टार्टअप कंपनीने विकसित केला आहे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here