Monday 2 May 2022

थोडी माहिती


🎯🔷 सेंद्रिय शेती :- सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र (22 टक्के हिस्सा) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ सिंचन :- राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील लाभक्षेत्रातील सिंचित क्षेत्र 2020-21 मध्ये 41.60 लाख हेक्टर आहे.

◆ पशुगणना :- पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात सातव्या क्रमांकावर आहे.

🎯🔷 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' योजना :-

◆ प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' सुरु करणार आहे.

◆ पीक विमा पॉलिसी शेतकऱ्यांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याची ही एक वितरण मोहीम आहे.

◆ उद्दिष्ट :- सर्व शेतकऱ्यांना धोरणांविषयी, जमिनीच्या नोंदी, दाव्याची प्रक्रिया आणि PMFBY अंतर्गत तक्रार निवारण याबाबत जागरूक करणे.

🎯 भारतातील पहिली बायोसेफ्टी लेव्हल - 3 मोबाईल प्रयोगशाळा महाराष्ट्रात :-

◆ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारती प्रवीण पवार यांनी नाशिक, महाराष्ट्र येथे भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेव्हल-3 कंटेनमेंट मोबाईल/फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.

◆ ही मोबाइल प्रयोगशाळा नव्याने उद्भवणाऱ्या आणि पुन्हा उदयास येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा तपास करण्यात मदत करेल.

◆ ही प्रयोगशाळा देशातील दुर्गम आणि जंगली भागात प्रवेश करण्यास सक्षम असेल.

◆ मानव आणि प्राणी स्त्रोतांचे नमुने वापरून उद्रेकाची तपासणी ICMR मधील विशेष प्रशिक्षित शास्त्रज्ञांच्या मदतीने केली जाईल.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...