5 ऑक्टोबर घडामोडी


राष्ट्रीय डॉल्फिन दिवस

5 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात पहिला राष्ट्रीय डॉल्फिन दिवस साजरा करण्यात आला. डॉल्फिनच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी मार्चमध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या घोषणेनुसार, राष्ट्रीय डॉल्फिन दिवस दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी डॉल्फिनच्या संवर्धनासाठी लोकसहभागाकडेही लक्ष दिले जाणार आहे.

डॉल्फिन हे निरोगी जलीय परिसंस्थेचे एक आदर्श सूचक म्हणून काम करतात, त्यामुळे डॉल्फिनचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

5 ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिनासंदर्भात महत्त्वाची माहिती

जागतिक शिक्षक दिन दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांना सर्वसाधारणपणे सन्मानित केले जाते आणि काही कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल सन्मानित केले जाते.

2022 च्या जागतिक शिक्षक दिनाची थीम (मुख्य थीम) 'शिक्षणाच्या परिवर्तनाची सुरुवात शिक्षकांपासून होते' अशी आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो.

भारतीय वंशाचे अभियंता विवेक लाल यांना अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडून लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार

भारतीय वंशाचे एरोस्पेस अभियंता विवेक लाल यांना अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हस्ते लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

विवेक लाल यांना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी स्वाक्षरी केलेल्या प्रशस्तिपत्रासह जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. लाल अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्समध्ये मुख्य कार्यकारी म्हणून काम करतात. या कंपनीने गार्डियन ड्रोनसारखी अत्याधुनिक मानवरहित हवाई वाहने (UAV) विकसित केली आहेत.

जनरल अॅटॉमिक्सचे प्रमुख होण्यापूर्वी, डॉ. लाल यांनी NASA, Raytheon, Boeing आणि Lockheed Martin सारख्या इतर मोठ्या संस्थांमध्ये काम केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...