११ ऑक्टोबर २०२२

पंतप्रधान संग्रहालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2022 रोजी दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले.

पूर्वी हे संग्रहालय नेहरू मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जात होते. त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय असे करण्यात आले आहे.

नेहरू मेमोरियल म्युझियमचे पंतप्रधान संग्रहालयात रूपांतर करण्यास केंद्र सरकारने 2018 मध्ये मान्यता दिली होती.

यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्याशी संबंधित आठवणी त्यात ठेवण्यात आल्या होत्या. आता त्यात देशाच्या सर्व 14 पंतप्रधानांची माहिती आहे.

या संग्रहालयासाठी सुमारे 271 कोटी रुपये खर्च आला आहे. संग्रहालयात दोन ब्लॉक आहेत. त्यांचे एकूण क्षेत्रफळ 15,600 चौरस मीटरमध्ये आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

28 एप्रिल TOP १० चालू घडामोडी MCQ

१. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची व्यापार तूट कोणत्या देशासोबत वाढली आहे? अ. अमेरिका B. फ्रान्स सी. चीन D. रशिया उत्तर: C. चीन २. 'जाग...