Monday 3 October 2022

दिनविशेष

 

२ ऑक्टोबर :- घटना

१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

१९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.

१९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

२ ऑक्टोबर :- जन्म

९७१: गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

१८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

१८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

१८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७)

१९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

१९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

१९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून २००६)

१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.

१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)

१९६८: झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.

१९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म).

२ ऑक्टोबर :- निधन

१९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८)

१९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३)

१९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५).

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...