Monday 3 October 2022

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.

स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.

स्वीडनच्या स्वांते पाबो यांना यावर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील (Discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution) अभ्यासासाठी हा पुरस्कार जाहीर.

नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी केली घोषणा.

कोण आहेत स्वांते पाबो?
स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक
त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालक

गेल्या वर्षीचे विजेते :- डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम 

या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता.

10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...