रंध्रीय प्राणीसंघ (Phylum Porifera)



हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला म्हणतात.

हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.

बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते

या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात,

हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून 'स्थांना 'स्थानबद्ध प्राणी' (Sedentary animals) म्हणतात.

ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा / शुकिकांचा (Spicules) किंवा स्पोंजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनिट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.

ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे से भक्षण करतात. ऑस्टीया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते.

त्यांचे प्रजनन मुकुलायन यो अलैंगिक पद्धतीने किंवा / आणि लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते

उदाहरणे :  सायकॉन, यूस्पोंजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, वुप्लेक्टेल्ला, इत्यादी.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...