Saturday 15 October 2022

इ.स. 1795 :- खर्ड्याची लढाई


सदरील लढाई ही पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च 1795 साली महाराष्ट्रातील 
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) येथे झालेली एक निर्णायक लढाई होती.
मराठा साम्राज्यवादी विस्तार करू इच्छिणाऱ्या नाना फडणवीसने हैद्राबादच्या निजामाकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली होती. निजामाचा मंत्री मुशिर मुल्कने सदरील मागणी फेटाळून लावताच पेशवा, दौलतराव शिंदे (मादजी शिंदेचा 
वारस), तुकोजी होळकर व दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च 1795 मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. 
यावेळी निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली असता ब्रिटिशांनी सदरील मदत नाकारली. परीणामी उघड्या मैदानावर मराठ्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. या किल्याला लगेचच मराठ्यांनी वेढा घातला व या किल्याला होणारा पाणी पुरवठा व अन्न पुरवठा खंडीत करुन किल्ल्या भोवती तोफा रचल्या.
अखेर भयग्रस्त निजामाने 13 मार्च 1795 साली तहाची याचना करून लढाईतून माघार घेतली व या तहाने सदरील लढाईची सांगता झाली. या लढाईत पराभुत झाल्यावर निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली.
              या तहातील अटींनुसार, 
निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये, थकलेल्या चौथाई देण्याचे मान्य केले.
स्वत:च्या ताब्यातील प्रदेशांपैकी एक तृतीअंश प्रदेश मराठ्यांचा स्वाधीन केला.
दौलताबादचा किल्ला तसेच त्याच्या भोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
तसेच वऱ्हाडचा प्रदेश नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...