Wednesday 20 March 2024

चालू घडामोडी :- 19 मार्च 2024


◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

◆ लाडा मार्टिन मार्बानियांग यांची बेळगावच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रेक्जेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिण आइसलँडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◆ आइसलँडमध्ये एकुण 33 सक्रिय ज्वालामुखी प्रणाली आहेत, जी युरोपमधील सर्वाधिक संख्या आहे.

◆ जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी माउंट एटना (3,350 मीटर) आहे, जो आफ्रिकन आणि यूरेशियन भूपट्टादरम्यान स्थित आहे.

◆ डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.

◆ 'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन' दरवर्षी 19 मार्च रोजी साजरा केला जातो.[Note :- 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन]

◆ 19 मार्च 2010 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

◆ DHL कनेक्टेडनेस इंडेक्समध्ये भारताला '62 वे' स्थान मिळाले आहे.

◆ व्लादिमीर पुतिन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ प्रसिद्ध कन्नड संगीतकार 'टीएम कृष्णा' यांना प्रतिष्ठेच्या 'संगीत कलानिधी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ तमिलिसाई सुंदरराजन यांनी तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.

◆ जयदीप हंसराज यांची ‘वन कोटक’ चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ प्रख्यात आदिवासी नेते आणि बौद्ध भिक्षू लामा लोबझांग यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

◆ भारतातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झाला आहे.

◆ केंद्रीय मंत्री 'अनुराग सिंह ठाकूर' यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.

◆ अमेरिकेतील प्रसिद्ध पियानोवादक 'बायरन जेनिस' यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

◆ तामिळनाडू राज्य सरकारने ‘पीएम श्री योजना’ लागू करण्यास सहमती दर्शवली आहे.

◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.

◆ WPL 2024 स्पर्धेत दीप्ती शर्मा(यूपी वॉरियर्सने) ही खेळाडू मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ठरली आहे.

◆ WPL 2024 स्पर्धेत सोफी मोलिनक्स(RCB - ऑस्ट्रेलिया) या महिला खेळाडू ला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

◆ काश्मीरच्या पर्यटन विभागांतर्गत श्रीनगरमध्ये पहिला  'फॉर्म्युला-4' कार रेस शो, फॉर्म्युला-4 आणि इंडियन रेसिंग लोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

◆ केंद्राकडून जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट असोसिएशनला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे.

◆ व्लादिमीर पुतीन यांची रशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्ष पदी पाचव्यांदा निवड झाली आहे.

◆ रशियाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना 88 टक्के मते मिळाली आहेत.

◆ रशियाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.

◆ प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे राजस्थान हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे.

◆ राजस्थान राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. त्यांना 'रामाश्रय' या नावाने ओळखले जाणार आहे.

◆ गुजरात राज्यातील खवडा येथे 'अदानी उद्योग समूह' जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे.

◆ भारत आणि अमेरिका यांच्यात 18 ते 31 मार्च दरम्यान 'टायगर विजय' युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ भारत हा अमेरिकेला स्मार्ट फोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

◆ तेलंगणा राज्याच्या राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

◆ भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजार पेठ आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..

🔴सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालच्या अध्यक्षपदी नियु...