अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
🔹 १८९७ – प्लेग प्रकरणावरून चाफेकर बंधूंनी पुण्यात कमिशनर रँड व आयर्स्टचा खून केला.
🔹 १९०० – सावरकरांनी पुणे येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली.
🔹 १९०२ – नरेंद्र भट्टाचार्य यांनी कलकत्त्यात अनुशीलन समितीची स्थापना केली.
🔹 १९०४ – सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली.
🔹 १९०५ – श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह सुरू केले.
🔹 १९०७ – बंगालमधील क्रांतिकारकांनी ले. गव्हर्नर फुलर यांच्या रेल्वेगाडीवर बॉम्ब फेकला.
🔹 ३० एप्रिल १९०८ – खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी कलेक्टर किंग्सफोर्डवर बॉम्ब फेकला.
🔹 २१ डिसेंबर १९०९ – अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.
🔹 १९०९ – मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून खून केला.
🔹 १९१० – नाशिक कटामध्ये सावरकरांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
🔹 डिसेंबर १९१२ – अवधबिहारी यांनी दिल्लीत हार्डिंग्जवर हत्तीवरून बॉम्ब फेकला.
🔹 १९१३ – लाला हरदयाळ यांनी कॅलिफोर्नियात गदर पार्टीची स्थापना केली.
🔹 १९२४ – सचिंद्रनाथ संन्याल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ची स्थापना केली.
🔹 ऑगस्ट १९२५ – चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी येथे रेल्वे अडवून सरकारी खजिना लुटला.
🔹 १९२८ – चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ची स्थापना केली.
🔹 १७ डिसेंबर १९२८ – लाहोर येथे दयानंद कॉलेजजवळ भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी सॅंडर्सचा खून केला.
🔹 ८ एप्रिल १९२९ – भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकला.
🔹 १८ एप्रिल १९३० – सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव कट राबविण्यात आला; महिलांचाही सहभाग होता.
🔹 २३ मार्च १९३१ – लाहोर तुरुंगात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी; तसेच जतींद्रनाथ दास यांचे ६४ दिवसांच्या उपोषणानंतर निधन.
No comments:
Post a Comment